Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यात बसचा अपघात

Update: 2023-08-16 05:48 GMT

Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यात बसचा अपघात

गेल्या काही महिन्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्यात बसच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यात बस पलटी झाल्याने अपघात झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana Bus Accident) सवणा ते चिखली या मार्गावर बसचा अपघात झाला. यामध्ये चालकासह 10 ते 15 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Bus Accident buldhana)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सवणा ते चिखली या रस्त्यावर बसच्या स्टेअरिंगचा रॉड लॉक झाला. त्यामुळे बस पलटी झाली. या बसमध्ये विद्यार्थ्यांसह 25 प्रवासी प्रवास करत होते. मात्र बसचा अपघात झाल्याने परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Tags:    

Similar News