“राजस्थानात राष्ट्रपती राजवट लागू करा”

Update: 2020-07-27 01:49 GMT

राजस्थानमधला (rajasthan) सत्तासंघर्ष सध्या चांगलाच चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर बसपाच्या अध्यक्ष मायावती (mayawati) यांनी राजस्थानमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी आपल्या सर्व आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आहे.

आमदारांनी आता राज्यात मैदानात उतरुन काम करण्याची गरज असताना अशाप्रकारे आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणे योग्य नसल्याची टीकाही मायावती यांनी केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजभवनाबाहेर केलेल्या आंदोलनावरुनही मायावती यांनी टीका केली आहे. पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारे राजभवनाबाहेर आंदोलन केले आहे. यावरुनच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याचे दिसत असल्याने इथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे ही वाचा...

‘गाडीचे स्टिअरिंग’ कुणाच्या हाती?

किरण बेदींना कोवीड-19 मंत्रालय? काय आहे सत्य?

राज्यात 24 तासात पुन्हा 9 हजारांच्यावर रुग्ण

दरम्यान बसपाच्या राजस्थानमधील 6 आमदारांनी काँग्रेसमध्ये विलिन होण्याचा निर्णय घेतला आहे. पण बसपा हा राष्ट्रीय पक्ष असल्याने अशाप्रकारे विलिनीकरणाचा निर्णय़ राज्याच्या पातळीवर होऊ शकत नाही, असं सांगत पक्षाने या 6 आमदारांना नोटीस बजावली आहे. याआधी बसपाने एक व्हीप जारी केला होता. त्यानुसार अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आला किंवा इतर काही काम झालेच तर पक्षाच्या 6 आमदारांनी काँग्रेस विरोधात मतदान करावे असे सांगण्यात आले होते.

Similar News