#governergoback : राज्यपालांकडून कुणाचाही अपमान नाही, नितेश राणेंनी केलं राज्यपालांचं समर्थन

Update: 2022-07-30 06:13 GMT

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुजराती आणि मारवाडी सोडून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वादग्रस्त वक्तवय केलं. त्यांचं वक्तव्य सध्या व्हायरल झालं असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर लोक टीका करत आहेत. पण भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांचं समर्थन करत त्यांनी कुणाचाही अपमान केला नसल्याचं म्हटलं आहे.

मुंबई-ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोक काढले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी य़ांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून मराठी माणूस त्यांच्यावर टीकेचा भडीमार करतोय. राजकीय नेते देखील त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. परंतू भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र राज्यपालांच्या या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. राज्यपालांचं समर्थन करताना, "मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही.. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे..

त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले?किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले?तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात.." नितेश राणेंनी असं वक्तव्य केलं आहे.

याशिवाय त्यांनी आणखी एक ट्विट करत उध्दव ठाकरेंचा दाखला दिलाय. त्यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणतात, "एवढेच कशाला .. तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी कडे देऊन ठेवली आहे ते चालत का ? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही ??"

यावरुन त्यांच्या या ट्विटला प्रतिक्रीया देताना अयोध्या पोळ यांनी खरे महाराष्ट्र द्रोही तुम्हीच आहात असं म्हणत नितेश राणेंवर टीका केली आहे.

Tags:    

Similar News