रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर नवनीत राणा दिल्लीकडे रवाना

Update: 2022-05-09 06:01 GMT

भाजपा खासदार नवनीत राणा यांना राजद्रोहाच्या खटल्यातून जामीन मंजूर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.उपचारानंतर त्यांनी आता दिल्लीचा रस्ता धरला आहे.महाराष्ट्रात राज्य सरकारकडून लोकप्रतिनिधींवर अन्याय होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

राणा दाम्पत्य दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचंही रवी राणांनी म्हटलं आहे. राणांच्या दिल्लीत भाजपच्या नेत्यांसोबत भेटीगाठी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आता मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या वादानंतर झालेल्या घडामोडीनंतर चर्चेत असलेल्या नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयातून सुटका मिळाली. बाहेर आल्यावर त्यांनी ठाकरे सरकारला आमची काय चूक होती असा सवाल करत, "तुम्ही आम्हाला हनुमान चालीसाच्या कारणावरुन अटक करत असाल तर मी चौदा दिवसंच काय चौदा वर्षे तुरूंगात राहायला तयार आहे." असं म्हटलं. ठाकरेंना चॅलेंज करत त्या आता दिल्लीला रवाना झाल्या आहेत.

अनिल परब आणि संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचारा प्रकरणी सुरू असलेल्या केसेसवर आम्ही केंद्रीय यंत्रणांकडून माहिती घेणार आहोत. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा पाठपुरावा करणार असून त्यावर लवकरात लवकर कारवाईची मागणी करणार असल्याचं राणा यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News