५ उमेदवारांना बदलण्याच्या भाजप हायकमांडने दिल्या शिंदे सेनेला सूचना...!

Update: 2024-03-24 06:03 GMT

भाजप हायकमांडकडून एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांची कोंडी होतेय का असा प्रश्न आता निर्माण होतोय कारण शिवसेनेच्या ५ खासदारांची उमेदवारी धोक्यात असल्याचं समोर आलं आहे. शिवसेनेच्या ५ उमेदवारांना त्यांच्या बदलाच्या सूचना मिळाल्या आहेत तर भाजप हायकमांडकडून शिंदेना सुचना मिळाल्याचं सांगितलं जात आहेत.

मिशन ४५ च्या अनुशंगाने महायुतीकडून जोरदार प्रयत्न सध्या महाराष्ट्रात होताना दिसत आहेत. याच अनुषंगाने राज्यातील खासदारांच्या मतदारसंघात जे सर्वे करण्यात आले होते. त्यामध्ये शिवसेनेचे आताचे जे ५ खासदार आहेत त्यांचे सर्वे हे निगेटीव्ह आल्याचं सांगितलं जात आहे.

त्यामुळे याठिकाणी नवा चेहरा द्यावा किंवा कुठेतरी बदल करण्यात यावा, अशा सूचना भाजप हायकमांडकडून एकनाथ शिंदेंना देण्यात आल्या आहेत.

भावना गवळी, गजानन कीर्तीकर, लोखंडे, हेमंत पाटील आणि कृपाल तुमाने यांची उमेदवारी धोक्यात असल्याचं कळतंय. अंतिम निर्णय आता एकनाथ शिंदे यांना घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. भाजपचं शिंदेंवर हे दबावतंत्र सुरु असल्याचंही बोललं जात आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना सिंदे गटातील काही उमेदवारांनी सिंदेंची भेट घेतली, खासदारखी वाचवण्यासाठीचीच ही भेट होती अशी चर्चा आता रंगलेली आहे.

कोण आहेत उमेदवारी धोक्यात आलेले खासदार ?

यवतमाळ-वाशिम - भावना गवळी

रामटोक - कृपाल तुमाने

हिंगोली - हेमंत पाटील

शिर्डी - सदाशिव लोखंडे

उत्तर पश्चिम - गजानन किर्तीकर

प्रामुख्याने पाहिलं गेलं तर भावना गवळी या अनेक वर्षे त्याठिकाणी खासदार म्हणून राहिलेल्या आहेत मात्र त्यांची कामगिरी असमाधानकारक असल्याचं सांगितलं जात आहे. तर किर्तीकर यांच्याकडे त्यांचं वाढतं वय आणि त्याचबरोबर त्यांच्या मुलानं केलेलं त्यांच्याविरोधातलं बंड हे एकुणच पाहता किर्तीकर यांची उमेदवारी धोक्यात आहे. इतर जणांची सुध्दा अशीच काहीशी परिस्थिती असल्यामुळे यांची उमेदवारी धोक्यात आल्याचं स्पष्ट केलं जात आहे. आता यावर एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags:    

Similar News