लक्षणं नसलेले कोरोनाबाधित आता घरी राहून घेऊ शकणार उपचार

Update: 2020-06-01 01:57 GMT

ज्या रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणं आढळून आले नाहीत, परंतु त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, अशा रुग्णांना त्यांच्या घरी राहून उपचार घेण्याची परवानगी मिळू शकते, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. हा पर्याय ऐच्छिक असणार असून त्यासाठी घरी अलगीकरणाची सोय असणं आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून घेणं बंधनकारक असणार आहे.

केंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार ज्या रुग्णांना लक्षणे आणि त्रास नाही मात्र कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, अशा रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या विलिनीकरणासाठीच्या सर्व सुविधा घरात उपलब्ध असतील आणि रूग्णाची इच्छा असल्यास अशा रूग्णास घरात राहून उपचार घेण्याची परवानगी आरोग्य अधिकारी देऊ शकतात.

हे ही वाचा...

'Mission Begin Again' तीन टप्प्यात, 3, 5 आणि 8 जून ला काय सुरु होणार?

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झाले ३४२ कोटी, कोरोनावर खर्च फक्त 23 कोटींचा

3 जून पासून राज्य Unlock Mode वर, कोणत्या बाबींमध्ये सुट मिळणार?

या पद्धतीने उपचार घेत असलेल्या रूग्णाच्या तब्येतीतील सर्व तपशीलाची दैनंदिन माहिती वैद्यकीय पथकाला देणे, घरातल्या इतर व्यक्तींपासून सुरक्षित अंतर राखून नेमून दिलेल्या कालावधीपर्यंत स्वतंत्र खोलीत राहणे, डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करणे, नियमितपणे वैद्यकीय पथकाच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे.

औरंगाबादमध्ये आतापर्यंत या पद्धतीने ५ रूग्णांवर घरी उपचार सुरू असून त्यापैकी एक रूग्ण बरा झाला आहे.

Similar News