TRP वॉर पुन्हा सुरू, अर्णब विरुद्ध इंडिया टुडे संघर्ष चिघळला

Update: 2022-03-17 14:57 GMT

सौ.सोशल मीडिया

गेल्या १७ महिन्यांपासून बंद असलेला चॅनेल्सचा टीआरपी आता पुन्हा एकदा सुरू झाला आहे. मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या टीआरपी घोटाळ्यानंतर टीआरपी बंद करण्यात आला होता. पण आता गुरूवारुपासून पुन्हा एकदा साप्ताहिक टीआरपी सुरू झाल्याने अनेक न्यूज चॅनेल्सने आपणच प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा केला आहे.


ज्या रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामीवर टीआरपी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता, त्या रिपब्लिक नेटवर्कने टीआरपीमध्ये मोठी आघाडी घेतल्याचा दावा अर्णब गोस्वामीने केला आहे. अर्णब गोस्वामीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे, यामध्ये अर्णबने इंडिया टुडे या इंग्लीश न्यूज चॅनेलवर जोरदार टीका केली आहे. रिपब्लिक ब्रँडला संपवण्याचा प्रयत्न झाला, पण प्रेक्षकांनी साथ दिली असा दावा अर्णब यात करत आहे.

तर इंडिया टुडेने दिवसभर आपल्या चॅनेलवर आपणच एक नंबर इंग्लीश चॅनेल असल्याचा दावा केला आहे. तसेच स्क्रीनवर ओरडून, प्रेक्षकांना घाबरवून टीआरपी मिळवता येत नाही, अशा आशयाचे अर्णबला चिमट्या काढणाऱ्या ब्रेकिंग न्यूज देखील चालवण्यात आल्या आहेत. गेले १७ महिने टीआरपी बंद असल्याने न्यूज चॅनेल्समधील स्पर्धा चर्चेत नव्हती, पण आता ही स्पर्धा पुन्हा सुरू होणार असे दिसते आहे.

Similar News