''हवा फक्त मामींचीच'' अमृता फडणवीसांना ट्रोल करणारी ही गॅंग आहे तरी कोण?

Update: 2023-01-08 14:02 GMT

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नुकतेच नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. त्यांच्या या गाण्याला लोकांकडून मोठी पसंती मिळत आहे. आपल्याला माहित आहे अमृता फडणवीस यांनी अत्यंत कमी कालावधीत संगीत शेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मग त्यांना अनेक वेळा समाजमाध्यमांवर ट्रोल करण्यात आलं. पण या ट्रोल गँगकडे त्यांनी कधीही लक्ष दिल नाही. त्यांचं नुकताच प्रदर्शित झालेलं 'मूड बना लेया वे' हे पंजाबी गाणे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. या गाण्याला पहिल्या २४ तासात ११ मिलियन लोकांनी पाहिलं आहे, तर १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. आता या लोकांच्या प्रेमाबद्दल अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करून सर्वांचे आभार मानले आहेत.

आता ज्या वेळी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे येते त्या वेळी त्यांच्या गाण्यावर येणाऱ्या लोकांच्या कॉमेंट्सची नेहमीच चर्चा होते. आता आपण गाण्यावरच्या नाही तर त्यांनी जी पोस्ट केली आहे त्यावर आलेल्या कॉमेंट्स काय आहेत हे पाहुयात. या कॉमेंट्स मधून अनेकांनी अमृता फडणवीसांचे कौतुक केले आहे, तर तितक्याच प्रमाणावर त्यांना नेहमी ट्रोल करणारी ट्रोल गॅंग इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे.. हेमंत धिंग्रा हे ट्विटर वापरकर्ते अमृता फडणवीसांचे कौतुक करत म्हणत आहेत की, ''खूप छान, तुमचे हे काम चालूच ठेवा..''

या पंजाबी गाण्याचे अनेक जण कौतुक करत आहेत. डॉ. प्रवीण सुनील पाटील म्हणतात की, What a change????? ''काय बदल आहे..?'' या गाण्यातील अमृता फडणवीस यांचा आवाज व अप्रतिम नृत्य यावेळी अनेकांना पसंत पडलेलं पाहायला मिळत आहे..

अशा प्रकारे अनेकांनी अमृता फडणवीसांचे अभिनंदन करणाऱ्या कॉमेंट्स केल्या आहेत. आता एकाद्या राजकीय शेत्रात कार्यरत असणाऱ्या पुरुषाची बायको स्वतःच्या पायावर काही करू लागते त्या वेळी त्यांना ट्रोल करणारे अनेक मंडळी समाजमाध्यमांवर ढिगाने आहेत. याच उत्तम उदाहरण म्हणजे अमृता फडणवीस आहेत. त्यांना या आधी अनेक वेळा त्यांच्या कपड्यावरून, त्या करत असलेल्या मेकप वरून, त्यांच्या आवाजावरून अनेक कारणांनी ट्रॉल केलं जातं. पण यामुळे त्या कधीच घाबरल्या नाहीत किंवा आपल्या कामापासून दुरावल्या नाहीत. या गाण्यावर देखील त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. आता त्यांनी आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट वर देखील हि ट्रोल गॅंग येऊन पोहोचली आहे.. आता हेच बघा ना 'बेरोजगार बिनोद' या नावाने असलेल्या ट्विटर वापरकर्त्याने लिहिलं आहे की, ''मॅडम आपल्या आवाजात इतका दम आहे की साहेबांच्या पोटा जवळ गायला तर पोट पण अंदर होऊन जाईल 😂

एखाद्या महिलेला अशा प्रकारच्या कॉमेंट कारण कितपत योग्य आहे. अशा प्रकारे बेवारस नावाने समाजमाध्यमांवर अकाउंट काढायचे आणि ट्रोल करायचे इतकच या मंडळींचे काम असते बहुदा.. अशा लोकांची समाजमाध्यमांवर कमी नाही. राम- बाण नावाने अकाउंट असेल्या एकाने म्हंटले आहे की. हवा फक्त मामींचीच 🤣

अरे एखादी महिला काही स्वतःच्या पायावर करू पाहते तर तिला असं का हिणवलं जात. आता फक्त त्यांचा पती राजकीय आहे म्हणून त्यांना अशा प्रकारे ट्रोल केलं जात असेल तर ते योग्य नाही. तुम्ही जर त्यांच्या पोस्टवर पाहिलं तर अशा अनेक कॉमेंट आहेत.. इक्बाल quadri म्हणता की. Eknath Shinde has resigned after hearing this

कंच्याभाऊ नावाने असलेला अकॉउंट यूजर म्हणतो की, माझे काका मागील 5 वर्षांपासून कोमात होते.....मग काय सकाळी काकांना मामीचे गाणे एकवले, काकांनी स्वतः उठून TV बंद केला...

अशा अनेक कॉमेंट आहेत. या सगळ्या ट्रोल गँग ला एक साधं उत्तर आहे, जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही तर ती तुम्ही पाहू नका. उगाच एकाद्या स्त्री ची बदनामी करणं योग्य आहे का..? या ट्रोल गॅंगच काय केलं पाहिजे? अमृता फडणवीसांना राजकीय हेतूने ट्रोल केलं जात का? एखादी महिला अशा प्रकारे स्वतःच्या पायावर काही करू पाहत असेल तर तिच्या विषयी असा प्रचार कारण योग्य आहे का? 

Tags:    

Similar News