महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Update: 2020-05-08 09:53 GMT

कोरोनाच्या प्रादुर्भावावर अजूनही नियंत्रण मिळत नसल्याने लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने महाविद्यालयीन परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अंतिम वर्षातील शेवटची सत्र परीक्षा सोडून सर्व परीक्षा आता रद्द करण्यात आल्या आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या आधीच्या मार्कांवरून पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांसाठी वर्षातील ५० टक्के परफॉर्मन्स ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याचबरोबर यूजीसीच्या गाईडलाइन्स प्रमाणे ग्रेड देणार असल्याचंही सामंत यांनी सांगितले आहे.

पण विद्यार्थ्यांसाठी काही पर्यायदेखील सरकारने ठेवले आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या मार्कांमध्ये सुधारणा करायची असेल तर पुढील वर्षी त्यांना ऐच्छिक परीक्षेची सवलत देण्यात येणार आहे. ग्रेड पद्धतीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये पाठवलं जाईल. पण ज्या विषयात नापास ते झाले आहेत त्या विषयाची परीक्षा त्यांना पुढच्या वर्षी द्यावी लागणार आहे. एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार पण या विद्यार्थ्यांना नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर ४ महिन्यात परीक्षा द्यावी लागणार आहे.

हे ही वाचा...


Maharashtra MLC Polls: निष्ठावंतांचा पत्ता कट! मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळे यांना तिकिट नाहीच…

राज्यातील ५२२८ कोरोना रुग्ण लक्षणं विरहित, राज्यात रुग्णांची संख्या 17 हजार 947

मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार, अखेर महापालिकेनं घेतली गंभीर दखल

धक्कादायक! मुंबई सायन हॉस्पिटल मध्ये मृतदेह ठेवायला जागा नाही, शव गृहाची क्षमता संपली

आर्थर रोड जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव, १०३ कोरोनाबाधीत

युजीसीच्या नियमांप्रमाणे अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करता येत नाही , त्यामुळे या परीक्षा होणारच अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. अंतिम वर्गाच्या परीक्षा या १ जुलै ते ३० जुलै दरम्यान होतील अशी माहितीही सामंत यांनी दिली आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत २० जूनपर्यंत सुधारणा झाली नाही तर यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे निर्णय घेतला जाईल असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घेतली जाणार आहे. ऑनलाईन ओरल घेऊन किंवा जर्नलच्या माध्यातून अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा होणार आहे.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या हजेरीबाबतच्या नियमांमध्ये लॉकडाऊनच्या ४५ दिवसांची उपस्थिती गृहीत धरली जाणार आहे. स्वायत्त विद्यापिठांनी सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे परीक्षा घ्यावा अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

Similar News