आर्थर रोड जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव, १०३ कोरोनाबाधीत

Courtesy: Social Media

मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये कोरोनाने शिरकाव केला असून इथल्या ७७ कैद्यांना आणि २६ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. या सगळ्यांवर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येणार आहेत, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा…


कोरोनाचा कहर – जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ३८ लाखांवर

मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार, अखेर महापालिकेनं घेतली गंभीर दखल

धक्कादायक! मुंबई सायन हॉस्पिटल मध्ये मृतदेह ठेवायला जागा नाही, शव गृहाची क्षमता संपली

याआधीच जेलमधील ७२ कैदी आणि ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती अशी माहिती जेलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता १८ हजारांच्यावर पोहोचली आहे. तर मुंबईतील एकूण कोरोनाबाधीत रुग्ण संख्या ११ हजारांच्यावर पोहोचली आहे.