कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्यास स्विकारणार नाही : मुख्यमंत्री

Update: 2020-10-11 11:31 GMT

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत राज्याला संबोधित करताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन दिलं. शेतकरी कायद्यांची जबरदस्तीची अंमलबजावणी सहन करणार नाही.शेतकरी हितासाठी तडजोड नाही.शेतकर्‍यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत असतानाच आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीच्या योजनेच्या अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू असून त्यामुळे अडचणी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे तो वर्क फ्रॉम करू शकत नाही. सर्वसामान्य जनतेला जगवण्यासाठी त्याला शेतात राहून भाग आहे म्हणून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणे अशक्य असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलं. याशिवाय, 'जे विकेल ते पिकेल' धोरणासाठी जनजागृती सुरु करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कांदा उत्पादनामध्ये शाश्वतता निर्माण करण्यासाठी महाओनियन प्रकल्प सुरू केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कृषी कायद्यांवर भाष्य करत कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्यास स्वीकारणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Tags:    

Similar News