देशात कोरोनामुळे युद्धजन्य स्थिती, विशेष संसदीय अधिवेशनाची शिवसेनेची मागणी

Update: 2021-04-19 05:13 GMT

देशात कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांच्या विशेष संसदीय अधिवेशनाची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करुन ही मागणी केली आहे. देशात सध्या अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच युद्धजन्य परिस्थिती आहे.

सर्वत्र केवळ तणाव आणि गोंधळ दिसतोय. रुग्णांना बेड नाहीयेत, ऑक्सिजन मिळत नाहीये आणि लससुद्धा मिळत नाहीये. हाच फज्जा सर्वत्र उडालेला दिसतोय. या संपूर्ण परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी दिवसांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे अशी मागणी राऊत यांनी केली आहे.


गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकार तसेच राज्यातील भाजप नेते यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर भाजपशासित गुजरातमध्येही कोरोना स्थिती भयावह असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशातील एकूण परिस्थिती बिघड़ल्याटी टीका करत राऊत यांनी ही मागणी केली आहे.

Full View

Tags:    

Similar News