Chief Justice of India : न्यायमूर्ती सुर्यकांत 53वे सरन्यायाधीश, 15 महिन्यांचा असणार कार्यकाळ

Update: 2025-11-24 07:53 GMT

देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत Justice Surya Kant यांनी आज 24 नोव्हेंबर 2025 शपथ घेतली. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांना देशाचा पुढील सरन्यायाधीश म्हणून oath ceremony शपथ दिली. पुढील 15 महिने सरन्यायाधीशपदाचा कार्यभार न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडे असेल.

ऐतिहासिक शपथविधी सोहळा Rashtrapati Bhavan ceremony

राष्ट्रपती भवनातील हा शपथविधी ऐतिहासिक ठरला आहे. भारतीय न्यायव्यवस्थेत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय न्यायिक शिष्टमंडळाने सरन्यायाधीशांच्या शपथविधीला हजेरी लावली. भूतान, केनिया, मलेशिया, मॉरीशस, नेपाळ, श्रीलंकेचे मुख्य न्यायाधीश उपस्थिती होते. शपथविधीनंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना यांना अभिवादन केले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आपल्या पालक आणि मोठ्या भावाचे आशीर्वाद घेतले. CJI सूर्यकांत पंतप्रधान मोदी, राजनाथ आणि अमित शहा यांची भेट घेतली तसेच माजी सरन्यायाधीश बीआर गवई यांची गळाभेट घेतली.

CJI सूर्यकांत यांची कारकीर्द

वयाच्या 22 व्या वर्षी हरियाणात वकिलीची सुरुवात

1985 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात वकिलीची सुरुवात

38 व्या वर्षी हरियाणाचे ॲडव्होकेट-जनरल म्हणून नियुक्ती

2004 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती

2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती

2025 मध्ये सरन्यायाधीशपदी नियुक्ती

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी अनेक घटनात्मक खंडपीठांवर काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी घटनात्मक, मानवी हक्क आणि प्रशासकीय कायद्याच्या बाबींचा समावेश असलेले 1000 हून अधिक निर्णय दिले.अलीकडच्या काळात सूर्यकांत अनेक प्रसिद्ध प्रकरणांच्या बाबतीत चर्चेत होते. ती प्रकरणं म्हणजे 2023 मध्ये कलम 370 रद्द करण्याचा निर्णय, बिहारमधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, कॉमेडियन समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शो संदर्भातील वाद आणि अशोका विद्यापीठातील प्राध्यापक मली खान महमूदाबाद यांना झालेली अटक.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


Full View

Similar News