देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३ लाखांच्यावर

Update: 2020-06-28 05:34 GMT

गेल्या 24 तासात देशभरामध्ये कोरोनाचे 20 हजारांच्या जवळपास रुग्ण आढळले आहेत. तर 410 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्याबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 16 हजारांच्या पुढे गेली आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये 19 हजार 906 रुग्ण आढळल्याने आता देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५ लाख 28 हजार 859 एवढी झालेली आहे. पण या एकूण रुग्णांपैकी 3 लाख 9 हजार 713 रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत. तर सध्या 2 लाख 3 हजार 51 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील एक सकारात्मक बाजू म्हणजे उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणि कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या यामध्ये आता एक लाखाचा फरक पडलेला आहे.

हे ही वाचा..

देशातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आता 58 टक्क्यांच्या पुढे गेलेले आहे. देशात सध्या दर दिवसाला दोन लाखांच्या वर रुग्णांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. कोरोना चाचण्यांची क्षमता वाढवण्याचा केंद्रीय आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.

सध्या कोरोना बाधित रुग्ण शोधणे, त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधणं आणि कोरोनाबाधितांवर उपचार करणं या तीन मुद्द्यांकडे सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्यादृष्टीने सर्व प्रयत्न सुरू आहेत.

Similar News