Home > News Update > दिलासादायक : कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 58 टक्क्यांच्यावर

दिलासादायक : कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 58 टक्क्यांच्यावर

दिलासादायक : कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 58 टक्क्यांच्यावर
X

देशात गेल्या महिनाभरात कोरोनाचे सुमारे तीन लाख नवीन रुग्ण आढळले असल्याने आतापर्यंत बाधा झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाखांच्यावर गेली आहे.

पण दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनाची बाधा झालेले आणि कोरनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत तब्बल 1 लाखांच्या जवळपास फरक निर्माण झाला आहे.

सध्या देशात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 98 हजार 493 ने जास्त आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 58.13 टक्के झाले आहे. कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाणदेखील आता सरकारने वाढवले आहे.

सध्या देशात दर दिवसाला 2 लाखांच्यावर रुग्णांच्या कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. सध्या देशात कोणत्या राज्यात किती रुग्ण बरे झाले आहेत ते पाहूया.....

महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 73 हजार 214 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गुजरातमध्ये 21 हजार 476, दिल्ली – 18 हजार 574, उत्तर प्रदेश 13 हजार 119, राजस्थान 12 हजार 788, पश्चिम बंगालमध्ये 10 हजार 126 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.

Updated : 28 Jun 2020 1:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top