15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्यदिन हे अर्धसत्य, शिवसेना खासदाराचे वक्तव्य

संभाजी भिडे याने भारताच्या स्वातंत्र्यदिनाबद्दल आणि राष्ट्रध्वजाबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर आता शिवसेना खासदाराने 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्यदिन हे अर्धसत्य असल्याचे वक्तव्य केले आहे.

Update: 2023-06-28 07:46 GMT

संभाजी भिडे याने भारताच्या स्वातंत्र्यदिनाबद्दल आणि राष्ट्रध्वजाबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर आता शिवसेना खासदाराने 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्यदिन हे अर्धसत्य असल्याचे वक्तव्य केले आहे.

गेल्या काही वर्षांपुर्वी कंगणा रनौत हीने 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्यदिन नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर संभाजी भिडे यानेही भारताच्या स्वातंत्र्यदिनाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनीही 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्यदिवस हे अर्धसत्य असल्याचे म्हटले आहे. 15 ऑगस्टला भारताची फाळणी होऊन पाकिस्तान वेगळा झाला. त्यामुळे पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले पण संपूर्ण हिंदूस्थानला स्वातंत्र्य मिळाले नसल्याचे वक्तव्य केले. मात्र राज्यघटनेने तिरंगा स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्याचा सन्मानही राखला जावा, असं मत प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News