बीड पोलिस अधिक्षक आर. रामास्वामींच्या कारभाराविरोधात पोलिसांची मॅटमध्ये धाव, काय आहे प्रकरण?

Update: 2021-11-10 11:14 GMT

मनमानी कारभार, सहकारी अधिकाऱ्यांचा सातत्याने अवमान, फिल्डवर न उतरता घरी किंवा कार्यालयात बसून केला जात असल्याचा आरोप बीड जिल्ह्याच्या अधिक्षकांवर सातत्याने केला जात आहे. मात्र, बीडच्या पोलीस अधीक्षक आर. रामास्वामी यांच्या विरोधात आता पोलीस दलातच असंतोष निर्माण झाला आहे. तब्बल अकरा पोलीस कर्मचाऱ्यांनी अन्यायकारक बदलीच्या विरोधात मॅट मध्ये धाव घेतली आहे.

बीड जिल्ह्यात एकीकडे अवैध धंदे वाढल्याचा आरोप केला जात असताना दुसरीकडे पोलीस प्रशासनच या लोकांशी हात मिळवणी करत असल्याचे अनेक प्रसंगातून समोर आले आहे. बीड येथे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यापासून आर. रामास्वामी हे वादग्रस्तच ठरले आहेत.

पोलीस अधिक्षक आर रामास्वामी यांनी नुकत्याच पोलीस दलात काही बदल्या केल्या आहेत. यामध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाचे काही प्रस्ताव होते. मात्र, स्वामी यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने तीन ते चार पोलीस मॅट मध्ये गेले आहेत. काही आजारपणामुळे बदली मागणाऱ्या पोलिसांना देखील एस.पी राजा यांनी ऐकून न घेता विनंती बदली न करता अन्याय केला असल्याचा आरोप होत आहे.

या सगळ्या प्रकारामुळे अखेर तब्बल 11 कर्मचाऱ्यांनी एस.पी च्या या अन्यायाविरुद्ध थेट मॅट मध्ये धाव घेतली आहे. अशाप्रकारे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणात न्यायालयात दाद मागण्याची ही बीड जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. या सगळ्या प्रकारानंतर आता पालकमंत्री, औरंगाबाद परिक्षेत्राचे आय.जी. काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Tags:    

Similar News