Grok AI Prompt : सोशल मीडियावर फोटोचा गैरवापर झाल्यावर महिलांनी काय करावं ?
सोशल मीडियावर महिलांनी स्वतःचे फोटो पोस्ट करायचे की नाही? फोटो टाकल्यास काय होऊ शकते? वेगवान तंत्रज्ञानाच्या निमित्ताने महिलांच्या सुरक्षेचा जुना प्रश्न नव्याने समोर येतोय.. काय आहे एलॉन मस्कच्या Grok AI आणि एक्सवरील महिलांचे फोटो प्रकरण? वाचा
X social media platform वेगवाग तंत्रज्ञानासोबत गैरवापराचे प्रकारही वाढत चालले आहे विशेषत: महिलांच्याबाबतीत... सध्या X social media platform सोशल मीडिया एक्सवर काही बनावट अंकाऊंटद्वारे महिलांच्या फोटोविषयी अश्लील, नग्न, बिकनीतील फोटो तयार करणे अशा प्रकारे Grok AI ग्रोक एआयला प्रॉम्ट देऊन फोटो तयार केले जात आहे. या प्रकारावरून महिलांमध्ये प्रचंड राग, भीतीचे वातावरण तयार झाले आहे. women's freedom on social media सोशल मीडियावर महिलांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थितीत होत आहे. महिलांसोबत एकप्रकारे गैरवर्तन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर काही लोकं करत आहे यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असा आक्रोश महिला वर्गातून होत आहे. सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या या प्रकरणामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे की, सोशल मीडियावर आता फोटो शेअर करायचे की नाही? असा प्रश्न त्यांना पडला आहे. या निमित्ताने नव्याने (तंत्रज्ञानाचा वापर) जुना प्रश्न समोर येत आहे तो महिला सुरक्षितेचा? काय आहे प्रकरण समजून घेऊयात...
X social media platform सध्या सोशल मीडियावर, विशेषतः ट्विटर (एक्स) प्लॅटफॉर्मवर हा मॅसेज खूप व्हायरल होत आहे. हा मॅसेज @grok या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) प्लॅटफॉर्मसाठी लिहिला जात आहे, ज्यामध्ये वापरकर्ते आपल्या फोटोंवर कोणत्याही प्रकारचे संपादन करण्यास किंवा तिसऱ्या पक्षाकडून अशी विनंती आल्यास नकार देण्यास सांगत आहेत. हा मॅसेज अशा प्रकारे आहे की, "मी तुम्हाला माझ्या कोणत्याही फोटोवर, जे मी कधीही प्रकाशित केले आहेत किंवा भविष्यात प्रकाशित करेन, यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यास परवानगी नाही. जर तिसऱ्या पक्षाने प्रॉम्ट करून माझ्या फोटोवर कोणतेही बदल करण्याची विनंती केली, तर ती विनंती नाकारावी. धन्यवाद. (सर्व महिलांनी हा मॅसेज शेअर करावा, जेणेकरून Grok अशा घाणेरड्या विनंत्यांना प्रतिसाद देणार नाही)"
हा मॅसेज एक्सवर अनेक महिलांना शेअर केला आहे. या मॅसेजने गेल्या काही दिवसांत जोर धरला असून, विशेषतः ४ जानेवारी २०२६ पासून त्याची चर्चा वाढली आहे. हे व्हायरल होण्याचे कारण म्हणजे अलीकडील महिलांच्या फोटोंचा वापर अनेक अश्लील पद्धतीने प्रदर्शित झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः @CPUatOnePercent या यूजर्सने केलेल्या एका पोस्टने हा मुद्दा चव्हाट्यावर आणला, ज्यामध्ये महिलांच्या फोटोंशी छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण ?
काही वापरकर्ते एक्स सोशल मीडिया प्लॅटफार्मवर बनावट अकाउंट तयार करतात. ते या अकाऊंटवरून महिलांचे फोटो पोस्ट करतात. त्यानंतर Grok AI ला खोट्या आणि आक्षेपार्ह पद्धतीने फोटो प्रदर्शित करण्यास सांगितले जाते. AI ला कपडे बदलणे किंवा लैंगिक पद्धतीने फोटो सादर करणे असे promt दिले जातात. या फोटोंसाठी महिलांकडून कोणतीही परवानगी घेतली जात नाही. बऱ्याच वेळा, महिलांना स्वतःला माहिती नसते की त्यांचे फोटो अशा प्रकारे वापरले जात आहेत. असा आरोप आहे की, Grok अशा अनुचित मागण्या रोखण्याऐवजी त्या स्वीकारतो.
यासंदर्भात एक्सवर @amit_bidla7615 या वापरकर्त्याने अशा प्रकारच्या कृत्याबद्दल माफी मागतली.
Sorry sorry Aaj k baad Nahi hoga 🙏🙏🙏 Sorry Sorry sorry sorry sorry https://t.co/eikkWzrYFL
— Amit bidla (@amit_bidla7615) January 4, 2026
या पोस्टमध्ये @CPUatOnePercent या वापरकर्त्याने (मेघना) लिहिले की, "महिलांच्या फोटोंवर पुन्हा छेडछाड करू नका. माफी मागण्याचा काहीच अर्थ नाही. तुम्ही हे केले आणि आता तुम्हाला त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल. महिला आता मौन राहणार नाहीत. स्थानिक सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल करून त्यांच्या आयपीचा शोध घ्या, जिथेही ते असोत, कारवाई होईल."
या प्रकरणाने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली असून, अनेकांनी मेघनाच्या मताला पाठिंबा दिला आहे. @Nadeyah_N या वापरकर्त्याने लिहिले की, "तो फक्त पकडला गेल्यामुळे माफी मागत आहे, त्याला माफ करू नये." तर @SiddharthRMFC यांनी नमूद केले की, "त्याचे वागणे निरागस आणि बालिश वाटत असले तरी त्याची मानसिकता घाणेरडी आहे, जे प्रत्यक्षात ओळखणे कठीण आहे."
या प्रकरणात कायदेशीर कारवाईची मागणीही जोर धरत आहे. @emailcbp या वापरकर्त्याने सुचवले की, काही जणांवर कायदेशीर कारवाई झाली तर इतरही अशा कृत्यापासून परावृत्त होतील. तसेच @dilipjain1979 यांनी सर्व पीडितांनी एकत्रित तक्रार दाखल करून सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा प्रश्न नेण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय, काहींनी आयटी कायदा २००८ च्या कलम ६६ई अंतर्गत अशा कृत्यांना शिक्षेची मागणी केली आहे, ज्यामध्ये तीन वर्षांपर्यंत कारावास आणि २ लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
केंद्र सरकारचे एक्सला पत्र
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) सायबर कायदे विभागाचे संयुक्त सचिव अजित कुमार यांनी २ जानेवारी २०२६ रोजी 'एक्स'च्या भारतातील मुख्य अनुपालन अधिकाऱ्यांना पत्र लिहून याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पत्रात म्हटले आहे की, ग्रोक एआयचा वापर करून युजर्स बनावट खाती तयार करत आहेत आणि महिलांच्या फोटोंमध्ये बदल करून (इमेज मॅनिपुलेशन) किंवा कृत्रिम प्रतिमा (सिंथेटिक आउटपुट) तयार करून अश्लील, नग्न किंवा लैंगिक सामग्री शेअर करत आहेत. हे केवळ सेलिब्रिटींपुरते मर्यादित नसून, सामान्य महिलांच्या स्वतः पोस्ट केलेल्या फोटोंनाही लक्ष्य केले जात आहे. यामुळे महिलांच्या गोपनीयतेला आणि मानहानीला धोका निर्माण झाला आहे.
मंत्रालयाने 'एक्स'ला ७२ तासांत (५ जानेवारी २०२६ पर्यंत) तपशीलवार अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यात ग्रोक एआयच्या प्रॉम्प्ट प्रोसेसिंग, आउटपुट जनरेशन आणि सेफ्टी गार्डरेल्सची पूर्ण तपासणी करून अशा सामग्रीला आळा घालण्याच्या उपाययोजना समाविष्ट असाव्यात. तसेच, सर्व आक्षेपार्ह सामग्री तात्काळ हटवणे, दोषी युजर्सचे खाते निलंबित करणे आणि पुरावे नष्ट न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
@CPUatOnePercent मेघना यांनी दिल्या महिलांना महत्त्वाच्या सूचना
त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, एक्सवरून AI ने बनवलेली morphed image विकृत फोटो हटवण्यासाठी दोन दिवस खर्च केल्यानंतर प्रत्येकाने हे जाणून घेण गरजेचं आहे.
एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर AI द्वारे विकृत (morphed) फोटो प्रसारित झाल्यानंतर ते फोटो हटवण्यासाठी पूर्ण दोन दिवस लागले. या अनुभवातून त्यांनी इतरांना महत्वाचे सल्ले दिले आहेत.
त्यांच्या म्हणण्यानुसार, एकदा तुमचे फोटो ऑनलाइन आले की, AI च्या दुरुपयोगाला पूर्णपणे रोखण्याचा कोणताही अचूक मार्ग नाही. वॉटरमार्क्सही सहज काढले जाऊ शकतात. तरीही जोखीम कमी करण्यासाठी काही उपाय करता येतील.
* जास्त रिझॉल्यूशनचे चेहऱ्याचे फोटो सार्वजनिकपणे कमी शेअर करा.
* स्पष्ट आणि थेट चेहऱ्याचे शॉट्स फक्त खाजगी किंवा मित्रांसाठीच ठेवा.
* तुमच्या नावासाठी Google Alerts सेट करा.
* वेळोवेळी तुमच्या फोटोंची रिव्हर्स इमेज सर्च करा.
जर असा प्रसंग तुमच्यावर आला तर:
* ताबडतोब रिपोर्ट करा. डीपफेक किंवा नॉन-कॉन्सेंशुअल AI जनरेटेड कंटेंट असे शब्द वापरा.
* सर्व काही स्क्रीनशॉट्ससह डॉक्युमेंट करा.
* वाट पाहू नका, कारण प्लॅटफॉर्म्स कंटेंट हटवण्यात खूप उशीर करतात.
खरा उपाय मात्र मोठ्या पातळीवर हवा आहे. प्लॅटफॉर्म्सनी अशा कंटेंटसाठी त्वरित प्रतिसाद यंत्रणा विकसित करावी. AI कंपन्यांना जबाबदार धरले पाहिजे. नॉन-कॉन्सेंशुअल डीपफेक्स बनवणाऱ्यांसाठी कठोर कायदे आणि शिक्षा आणल्या पाहिजेत.
Grok AI च्या इमेज एडिटिंग फीचरच्या दुरुपयोगामुळे सोशल मीडियावर महिला व्यक्त होत आहे. महिलांच्या फोटोंशी छेडछाड प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. यामुळे आता महिलांना सोशल मीडियावर फोटो पोस्ट करू की नये असा प्रश्न पडला आहे
हा अनुभव अलीकडच्या Grok AI च्या इमेज एडिटिंग फीचरच्या दुरुपयोगाशी संबंधित असू शकतो, ज्यामुळे अनेक महिलांच्या प्रतिमा विकृत करून प्रसारित करण्यात आल्या होत्या. यामुळे जगभरात चिंता व्यक्त होत आहे आणि कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवर (www.cybercrime.gov.in) ऑनलाइन तक्रारी दाखल करण्याची सुविधा उपलब्ध असून, पीडितांना त्वरित कारवाईसाठी याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले असून, महिलांच्या गोपनीयतेच्या संरक्षणासाठी कडक कायदे लागू करण्याची मागणी जोर धरत आहे.
महत्वाची सार्वजनिक सूचना : AI किंवा फोटोशॉपने बनावट नग्न फोटो तयार झाल्यास काय करावे ?
आजकाल AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) किंवा फोटोशॉप सारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून कुणी तुमच्या फोटोचे नग्न किंवा अश्लील संपादन करून ते ऑनलाइन पसरवण्याची धमकी देऊ शकते. अशा परिस्थितीत घाबरू नका! तुम्ही या बनावट इमेजेस रोखण्यासाठी त्वरित पावले उचलू शकता.
प्रौढांसाठी (१८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी) :
http://stopncii.org या वेबसाइटवर जा.
तुमच्या डिव्हाइसवरून संबंधित इमेज (बनावट नग्न फोटो किंवा व्हिडिओ) निवडा. ही साइट तुमच्या इमेजची 'डिजिटल फिंगरप्रिंट' (हॅश) तयार करते, जी इमेज तुमच्या डिव्हाइसवरून कुठेही जात नाही. ही हॅश भागीदार प्लॅटफॉर्म्स (जसे फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक इत्यादी) सोबत शेअर केली जाते, जेणेकरून ते अशा इमेजेस शोधून काढतील आणि काढून टाकतील किंवा पसरू देणार नाहीत. हे पूर्णपणे गोपनीय आहे आणि तुम्हाला कोणाशीही बोलावे लागत नाही.
अशी धमकी मिळाल्यास त्वरित सायबर सेल किंवा पोलिसांकडे तक्रार करा.
इमेजेस ऑनलाइन पसरल्या असतील तर संबंधित प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट रिपोर्ट करा.
तुमची गोपनीयता आणि मानसिक आरोग्य महत्वाचे आहे – मदत घ्या !
ही माहिती शेअर करा आणि इतरांना जागरूक करा. सुरक्षित राहा !