प्रगत महाराष्ट्राच्या अंतरंगातील वास्तव

Update: 2022-04-04 12:54 GMT

नाशि– no water in few villages of nashik district, women are entring in well to get one bucket waterकः देशासह महाराष्ट्राचा विकास होतो आहे, असा दावा सर्वच पक्ष करत असतात...पण ग्रामीण महाराष्ट्रात विकास खऱंच पोहोचला आहे का, असा प्रश्न निर्माण करणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे....उन्हाच्या झळा आता तीव्र झालेल्या आहेत. अनेक भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील मेटघर गावातल्या महिलांना हंडाभर पाण्यासाठी ५० फूट खोल विहिरीत जीव धोक्यात घालून उतरावे लागत आहे. सटाणा तालुक्यातील रातीर येथे संतापलेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकत ग्रामसेवक व सदस्यांना कोंडले देखील होते. तालुक्यातील रातीर, सुराणे, रामतीर आदी खेड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरतेय, पण ढीम्म प्रशासनाला याचे सोयरसुतक नाही.

Similar News