...म्हणुन कामगारांना मारहाण केली- कप्तान मलिक

Update: 2020-01-15 14:27 GMT

पुर्व उपनगरातील नगरसेवक कप्तान मलिक (Kaptan Malik beat labours in Mumbai) यांनी रस्त्यावर केबल टाकण्याचं काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चांगलच तापलं आहे. याविषयी आज कप्तान मलिक यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. कंत्राटदाराच्या दादागिरीमुळे आपण हे पाऊल उचललं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

संबंधित व्हिडीओ...

“कंत्राटदार महानगरपालिकेला कुठे ना कुठे धक्का पोहोचवण्याचं काम करत होता. त्यांना एक दिवस आधी विनंती करुन काम थाबंवण्यास सांगितलं होतं. विनापरवानगी त्यांनी काम चालवलं होतं. एक दिवसआधी काम थांबवायला सांगूनही त्यांनी पुन्हा काम चालू केलं. कॉन्ट्रॅक्टरची दादागिरी वाढली होती म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं.” असं म्हणत नगरसेवक कप्तान मलिक यांनी आपल्या कृत्याचं समर्थन केलं आहे. पाहा व्हिडीओ...

Full View

Similar News