...म्हणून मी मुंबईला सोडू शकत नाही: जयप्रकाश सिंह

Update: 2020-05-14 12:17 GMT

माझं मूळ गाव उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर आहे. तिकडचे लोक मला फोन करतात. माझ्या कुटुबांतील लोक मला कॉल करत आहेत. मुंबईत कोरोना व्हायरस आहे. माझे आजोबा 1955 ला मुंबईला आले होते. तसं पाहिलं तर मुंबईत आमची आता चौथी पीढी आहे. सध्या कोरोना व्हायरस ची सर्वात वाईट परिस्थिती मुंबईची आहे. मुंबई हा सर्व देशात हॉटस्पॉट झाला आहे.

मात्र, जसं गाव मला प्रिय आहे. तशी मुंबई मला सर्वात जास्त प्रिय आहे. मी मुंबईल सोडू शकत नाही. मुंबईत माझे मित्र आहे. मुंबईत माझे शाळेतील, कॉलेज मधील मित्र, मी ज्यांच्या सोबत राहिलो काम करतो. ते सहकारी आहेत. या मुंबईत मी 44 वर्ष राहिलो. या मुंबईनं मला आसरा दिला. अशा वाईट परिस्थिती मी मुंबईला सोडून जाऊ शकत नाही. मुंबई रडत आहे. इथल्या मजुरांना मदतीची गरज आहे. अशा परिस्थितीत मी माझ्या मूळ गावी कसं जाणार? माझे कुटूंबातील लोक मला खूप आवडतात. तिकडच्या लोकांची समस्या देखील मला महत्वाची आहे.

पण मी माझ्या कर्मभूमीला अशा स्थितीत सोडून जाऊ शकत नाही. मुंबई हा आपला अभिमान आहे.

जय हिंद

जय मुंबई

जय महाराष्ट्र

जय उत्तरप्रदेश

Full View

Similar News