WhatsAppHack :  सरकार वैचारीक विरोधकांवर दडपशाही आणत आहे - अन्वर राजन

Update: 2019-11-02 12:29 GMT

२०१९ च्या निवडणूक काळात सरकारने सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातुन पाळत ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? कसं समोर आलं व्हॉट्सएप हॅकींग प्रकरण? सरकार नागरिकांवरती पाळत ठेवतंय का ? राज्यातल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर, पत्रकार, वकिलांवर हेरगिरी का केली जात आहे.? व्हॉट्सअॅप ने आपल्यासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे का? या घटनेनं भारताची लोकशाही धोक्यात आली आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांच्याशी आम्ही बातचित केली.

‘ज्या सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचे व्हॉट्सअॅप हॅक करण्यात आले आहे ते सर्व लोक सरकारच्या विरोधात आवाज उठवतात. म्हणून त्यांचे व्हॉट्सअॅप हॅक करण्यात आले आहे.’ असं मत यावेळी अन्वर यांनी ‘मॅक्समहाराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केलं.

“सरकार आपले जे वैचारिक विरोधक आहे. त्यांच्यावर दडपशाही करण्याचा कुठेतरी प्रयत्न करत आहे. भारतीय संविधानानाने दिलेले अधिकार लोकांच्या पासून हिरावत आहेत.” अशी भावना सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांनी व्यक्त केले आहे.

https://youtu.be/a1R5sqqiedE

Similar News