नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर उध्दव ठाकरेंची पहिली प्रतिक्रीया

Update: 2022-10-09 05:37 GMT

केंद्रीय निवडणुक आयोगाने येत्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवलं. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रीया दिली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गट यांच्यामध्ये सूरू असलेल्या लढाईवर अखेर निवडणुक आयोगाने निकाल दिला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दोन्ही गोठवण्याचा निर्णय़ घेतला आहे. शिवसेनेच्या दोन गटांपैकी शिंदे गटाने ही जागा भाजपसाठी सोडली आहे तर उध्दव ठाकरे ही जागा त्यांच्याक़डेच ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. मुळात पक्ष चिन्ह गोठवल्यामुळे शिंदे गटाला फारसा फरक पडणार नाहीये, मात्र ठाकरे गट निवडणुक लढवणार असल्याने त्यांना मात्र या गोष्टीचा फटका बसणार असल्याची चिन्ह आहेत.

या सगळया प्रकारावर उध्दव ठाकरे यांची प्रतिक्रीया आली नसती तरच नवल! त्यांनी आपली प्रतिक्रीया त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत 'जिंकून दाखवणरच' अशी दोन शब्दांत प्रतिक्रीया दिली आहे.

Tags:    

Similar News