कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास अद्याप सुरूच

Update: 2024-02-17 12:08 GMT

'शिवाजी कोण होता ?' या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास गेल्या ९ वर्षापासून सुरू असून त्यात आत्तापर्यंत काहीही प्रगती झालेली नाही. आता पानसरे यांच्या कुटूंबियांकडून मुंबई उच्च न्यायालयात खळबळजनक दावा करण्यात आला. पानसरे यांनी "शिवाजी कोण होता ?" हे पुस्तक लिहिले म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा त्यांच्या कुटूंबीयांकडून उच्च न्यायालयात करण्यात आला.

दि. २० फेब्रुवारी २०१५ रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूर शहरात बंदुकीने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या सुत्रधाराचा आत्तापर्यंत यंत्रणेकडून शोध लागलेला नाही. या प्रकरणाचा तपास सुरूवातीला सीआयडीकडे देण्यात आला होता. परंतु सीआयडीकडून योग्य तपास होत नसल्यामूळे गेल्यावर्षी हा तपास एटीएसकडे सोपवण्याची मागणी पानसरे यांच्या कुटूंबियांनी केली. त्यानुसार एटीएसकडे तपास देण्यात आला तरी तपासाची स्थिती ही जैसे थे सूरूच आहे. यामूळे चार आठवड्यात पुढील अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडूनही मुख्य मारेकरी अद्याप मोकाटड का ? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला. यावेळी पानसरे यांच्या कुटूंबीयांकडून नवे पुरावे उच्च न्यायालयात सादर करण्यात आले. 

Tags:    

Similar News