शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केंद्र सरकारला करावाच लागेल - जयंत पाटील

दिल्लीतील वातावरण दिवसेंदिवस अशांत होत असल्याचं दिसत आहे. दिल्ली शेतकरी आंदोलनाला ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान हिंसक वळण लागल्यानंतर सरकारने कडक पावलं उचलायला सुरुवात केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रजासत्ताकदिनी जे घडलं त्याच कोणीच समर्थन करत नाही. पण शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केंद्र सरकारला करावाच लागणार असल्याचं म्हटलं आहे.

Update: 2021-01-29 11:38 GMT

देशात शेतकर्‍यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न एका बाजूला होत आल्याच दिसत आहे. २६ जानेवारीला जे घडलं त्याच कोणीच समर्थन करत नाही. पण शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये. ट्रॅक्टर मोर्चामध्ये जे झालं त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केंद्र सरकारला करावाच लागेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणले आहेत.

दिल्लीतील वातावरण दिवसेंदिवस अशांत होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. दिल्ली शेतकरी आंदोलनाला ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान हिंसक वळण लागल्यानंतर सरकारने कडक पावलं उचलायला सुरुवात केली होती. सरकारने गाझीपूर सीमेवर कलम 144 देखील लागू केलं होत. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात केले होते. यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली. कोणालाही अटक होणार नाही, इथं गोळी चालवली गेली तर पोलीस प्रशासन जबाबदार असेल. असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. पण आता प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी ज्या ठिकाणी आंदोलनास बसले आहेत त्या दिल्लीच्या सीमांवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाला आहे. सिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकरी आणि स्थानिकांमध्ये जोरात धुमश्चक्री झाली.

Full View


Tags:    

Similar News