सुप्रिया सुळे ठरल्या देशातील सर्वोत्कृष्ट खासदार

सुप्रिया सुळे (Supriya Sule) ठरल्या आहेत देशातील सर्वोत्कृष्ट खासदार.

Update: 2023-05-07 07:07 GMT

खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule)यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट Best Parliamentarian Award खासदार हा सन्मान पटकावला आहे. संसदेतील खासदारांच्या कामगिरीचा अहवाल इ-मॅगझीनच्या माध्यमातून नुकताच प्रसिद्ध झाला. या अहवालामध्ये या लोकसभा सत्रात खासदारांनी केलेल्या कार्याचे विविध बाबींमध्ये मूल्यमापन केले जाते. यामध्ये खासदारांनी मांडलेली विधेयके, त्यांची सभागृहातील उपस्थिती, सभागृहातील चर्चासत्रात त्यांनी घेतलेला सहभाग यासह अनेक बाबीची नोंद केली जाते. खा.सुप्रिया सुळे यांनी तब्बल ११३ विधेयके मांडली. त्यांनी एकूण ५४६ प्रश्न विचारले तर त्या २२९ चर्चा सत्रांमध्ये सहभागी झाल्या. संसदेतील त्यांची उपस्थिती ९३ टक्के आहे.

आपल्या मुद्द्याची सखोल प्रभावी आणि संयत मांडणी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न त्या संसदेत मांडतात. आपल्या राजकीय कौशल्याने खा. सुप्रिया सुळे यांनी सर्वोत्कृष्ट खासदार हा पुरस्कार पुन्हा एकदा पटकावत महाराष्ट्राचा देशात सन्मान वाढवला आहे.

Tags:    

Similar News