ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासह कुटूंबियांची चौकशी पूर्ण

बेकायदा मालमत्ताप्रकरणी उद्धव ठाकरे गटातील राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांची मंगळवारपासून अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. अखेर ही चौकशी बुधवारी सायंकाळी पूर्ण झाली.

Update: 2023-04-19 14:55 GMT

बेकायदा मालमत्ताप्रकरणी उद्धव ठाकरे गटातील राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांची मंगळवारपासून अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. अखेर ही चौकशी बुधवारी सायंकाळी पूर्ण झाली.

आमदार राजन साळवी, त्यांच्या पत्नी अनुजा साळवी, भाऊ दिपक साळवी, मुलगा शुभम साळवी व अथर्व साळवी तसेच दीपक साळवी यांचा मित्र सुरेंद्र भाटकर यांची अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशी होणार होती. त्यासाठी मंगळवार (दि. 18 एप्रिल ) साळवी यांच्यासह त्यांचे कुटूंबिय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उप अधीक्षक कार्यालयात दाखल झाले होते.

ही चौकशी साडेसहा वाजेपर्यंत करण्यात आली. तब्बल साडेसात तास चौकशीनंतर पुन्हा त्यांना बुधवार ( दि. 19 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यामुळे राजन साळवी व त्यांचे कुटुंबिय बुधवारी दाखल झाले. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली.

दोन दिवसाच्या चौकशी नंतर राजन साळवी त्यांच्या निवासस्थानी परतीच्या मार्गावर निघाले. या चौकशीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाला लागणारे सर्व कागदपत्र व माहीती पुरविण्यात आली असल्याचे साळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Tags:    

Similar News