शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सारं काही आलबेल, शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिले स्पष्ट संकेत

Update: 2023-05-26 12:50 GMT

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला साधारणतः ११ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत आतापासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचं सरकार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा खासदार गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kiritkar) यांनी थेट भाजपविरोधात तक्रार केलीय. भाजपकडून आम्हांला सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार खासदार कीर्तिकर यांनी माध्यमांसमोरच केलीय.

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १३ खासदारांसह बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं. आता या सरकारलाही लवकरच १ वर्षाचा कालावधी पूर्ण होईल. मात्र, त्याआधीच शिंदे-फडणवीस सरकारमएध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. कारण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार माध्यमांशी बोलतांना केलीय. कीर्तिकर यांच्या या तक्रारीनंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सुरू असलेला संघर्ष यानिमित्तानं पुढे आल्याची चर्चा सुरू झालीय.

आम्ही १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आलोय, त्यामुळं आम्ही एनडीए (National Democratic Alliance) चा घटक पक्ष आहोत. आम्ही एनडीएचा भाग आहोत, त्यामुळं आमची कामं झाली पाहिजेत. घटकपक्षाला दर्जा पाहिजे, ही आमची मागणी असल्याचं कीर्तिकर म्हणाले. भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत असल्याचा गंभीर आरोपच कीर्तिकर यांनी यावेळी केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये चर्चा सुरू होते. मात्र, आता सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्येही लोकसभा निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात नेत्यांनी चर्चा करायला सुरूवात केलीय. कीर्तिकर यांना यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, आम्हांला २२ जागांवर दावा करण्याची गरजच नाही. २२ जागा शिवसेनेच्या आहेतच. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र लढले होते. त्यावेळी भाजापला २६ आणि शिवसेनेला २२ जागा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी भाजपचे २३ तर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते, याची आठवण कीर्तिकर यांनी करून दिली.

Tags:    

Similar News