राज ठाकरे यांना शाहू महाराजांची एलर्जी आहे का?

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनानिमीत्त राज्यभरातून शाहू महाराजांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शाहू महाराजांच्या स्मृतीदिनाचा विसर पडल्याचे चित्र आहे.

Update: 2022-05-07 02:31 GMT

सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहीणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमीत्त राज्यभरात 100 सेकंद स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली. तर सोशल मीडियावरूनही शाहू महाराजांना वंदन करण्यात आले. मात्र शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमीत्त राज ठाकरे यांनी साधे ट्वीटही न केल्याने राज ठाकरेंना शाहू महाराजांची एलर्जी आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे चर्चेत आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा असो वा ठाणे येथील सभा किंवा औरंगाबाद येथील सभा यामध्ये शरद पवार हे शाहू-फुले-आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नसल्याची टीका केली होती. त्यावरून राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या भाषणाचे व्हिडीओ दाखवण्यात आले होते. मात्र दुसरीकडे शाहू-फुले-आंबेडकर यांचा महाराष्ट्र असल्याच्या राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. राज ठाकरे यांना शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची एलर्जी आहे का? असा सवाल त्यावेळी पडला होता.


 


राज ठाकरे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमीत्त कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा वैयक्तिकरित्या शाहू महाराजांना वंदन केल्याचे दिसून आले नाही. एवढंच नाही तर राज ठाकरे यांच्या ट्वीटर व फेसबुकवरही याबाबत पाहिले असता त्यावरही राजर्षी शाहू महाराजांना स्मृतीदिनानिमीत्त वंदन करण्यात आल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना शाहू महाराजांची एलर्जी आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.



 


Tags:    

Similar News