आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदी उत्तर देणार

Update: 2023-08-10 09:56 GMT

विरोधकांकडून लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत 8 ऑगस्टपासून चर्चा सुरु झाली आहे. या आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत.

काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात करताना विरोधकांचा अजेंडा मणिपूरमधील परिस्थिती असेल, असं स्पष्ट केलं होतं. तर काल (बुधवारी 9 ऑगस्ट) राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन भाजप आणि पंतप्रधानांवर हल्लाबोल केला होता. त्याला गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार उत्तर दिलं.

दरम्यान आज सत्ताधारी आणि विरोधी खासदार अविश्वास ठरावाच्या चर्चेत सहभागी होणार आहेत. शेवटी, पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना अविश्वास प्रस्तावाला सामोर जावं लागलं होतं. तेव्हाही विरोधकांकडे संख्याबळ नव्हतं. आजही मतदान झाल्यास अविश्वास ठराव फेटाळला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Tags:    

Similar News