पासष्ठीत निवृत्त होणारे राजकारणी कोण? पहा सुहास पळशीकर यांचे विश्लेषण

भारतीय राजकारणात निवृत्तीचा मुद्दा अनेकदा चर्चिला जातो. पण पासष्ठीत निवृत्त होणारे राजकारणी तुम्हाला माहिती आहेत का? याविषयी वाचा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांचे विश्लेषण

Update: 2023-05-08 14:45 GMT

डोकं खाजवून त्याची उदाहरणं तुम्हाला कदाचित सापडतील मला माहिती असलेलं एक छोटं उदाहरण जे आहे ते महाराष्ट्रातल्या संगमनेरचे आमदार होते. BJ खताळ पाटील यांचं आहे. त्यांनी ऐंशीच्या निवडणुकीत असं जाहीर केलं ऐंशी सालच्या की ही माझी शेवटची निवडणूक आहे. आणि नंतर ते निवडणुकीला तर उभे राहिले नाहीतच. पण सार्वजनिक जीवनातून बाहेर पडले. आणि आपल्या घरी शांतपणे त्यांनी उरलेलं आयुष्य व्यतीत केलं. म्हणजे जवळपास वयाच्या पासष्ठीत त्यांनी ही निवृत्ती पत्करली. आणि आत्ता परवा वयाच्या शंभरीमध्ये त्यांचं निधन झालं, असे नेते कार्यकर्ते, असे राजकारणी अगदी विरळ असतात. इतर वेळेला आपल्याला जे दिसतं ते असं की, एखादी व्यक्ती राजकारणात पडली की ती सहसा राजकारणातून निवृत्त होत नाही.

Full View

Tags:    

Similar News

यंदा कोण...?