कोरोना वाढीबाबत पंतप्रधान चिंतेत: सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक

Update: 2021-07-16 04:35 GMT


राज्याला होणारा लसीकरणाचा पुरवठा याबाबत शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.यावेळी इतर पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत देखील चर्चा होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यासोबत ही पंतप्रधान कोविडच्या वाढत्या प्रभाव आणि राज्यातील लसीकरणाबाबत चर्चा करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा ही बैठक सकाळी अकरा वाजता पार पडणार आहे.

देशभरात कोरोनाची दुसर्‍या लाट ओसरत असताना तज्ञांकडून तिसऱ्या लाटेचे अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यातच कोरोना विषाणूचे वेगवेगळे म्युटेशन समोर आलेले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या अधिक असलेल्या राज्यात या नवीन म्युटेशनवर देखील कटाक्षाने लक्ष ठेवले जावे यासंबंधीच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दिल्या जाणार आहेत.कोरोनाचे नवीन म्युटेशन अजून धोकादायक असू शकतील. अधिक काळजी घेण्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.केंद्राकडून राज्याला सध्या लसीकरणाचा साठा कमी दिला जात आहे. त्यामुळे अनेक वेळा राज्यांमध्ये लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागतात. त्यामुळे मागणी एवढा राज्याला लसीकरणाचा पुरवठा करावा, अशी मागणी मुख्यमंत्री पंतप्रधानांना करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य घेत असलेल्या उपायोजना बद्दल पंतप्रधानांना माहिती देतील.

Tags:    

Similar News