मग पेट्रोल डिझेल मधून 26 लाख कोटी का कमावले? काँग्रेसचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिगर भाजपशासित राज्यांवर पेट्रोल डिझेल वरुन केलेल्या टीकेला काँग्रेसकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले असून जगात पेट्रोलियम चे दर कमी असताना केंद्र सरकारने 26 लाख कोटी का कमावले ?असा थेट आरोप काँग्रेसने केला आहे.

Update: 2022-04-28 03:52 GMT

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिगर भाजपशासित राज्यांवर पेट्रोल डिझेल वरुन केलेल्या टीकेला काँग्रेसकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले असून जगात पेट्रोलियम चे दर कमी असताना केंद्र सरकारने 26 लाख कोटी का कमावले ?असा थेट आरोप काँग्रेसने केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोल-डिझेलवरील केंद्रीय अबकरी करांमधून २६ लाख कोटी रुपये कमवतात, असा आरोप काँग्रेस नेते पवन खेरा (Pawan Khera) यांनी मोदींवर केला आहे.देशातील मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. यात मोदींनी बिगर भाजप शासित राज्यांना पेट्रोल-डिझेलवरील दरांवरुन टीका केली आहे. व्हॅट जास्त असल्याने महाराष्ट्र व पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर जास्त असल्याचे ते म्हणाले. याचा समाचार खेरा यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पेट्रोल-डिझेलवरील (Petrol Diesel Prices) केंद्रीय अबकरी करांमधून २६ लाख कोटी रुपये कमवले. याबाबत ते माहिती देतील का, असा सवाल त्यांनी मोदींना केला.

तुम्ही राज्यांच्या वाटेचा वस्तू व सेवा कर दिलेला नाही. असे असताना तुम्ही राज्यांना म्हणतायत की व्हॅट कमी करण्यास सांगत आहात. तुम्ही केंद्रीय अबकरी कर कमी करा आणि तेव्हा इतरांना व्हॅट कमी करण्यास सांगा, असे आवाहन पवन खेरा यांनी नरेंद्र मोदी यांना केले आहे.


इंधनावरील किंमती गेल्या नोव्हेंबरमध्ये केंद्राने अबकरी कर घटवले आहे. राज्यांनी कर कमी करावेत, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. मी कोणावरही टीका करत नाही. मात्र मी महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तामिळनाडू या राज्यांना व्हॅट कमी करुन लोकांना त्याचा फायदा द्यावा, असा सल्ला मोदींनी दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उर्वरित बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधानांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे.

Tags:    

Similar News