या झुंडशाहीविरोधात आपली लढाई; नगरमधून राऊतांचा घणाघात

Update: 2024-01-28 11:13 GMT


अहमदनगर : लोकसभा निवडणुकांचे वारे सध्या राजकीय मैदानात वाहू लागले आहेत. ठाकरे गटाने येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली असून राज्यात सगळीकडे कार्यकर्ते मेळावे आणि जाहीर सभांचे कार्यक्रम पार पडत आहेत. सध्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आहेत. नगरमध्ये राऊत यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचा कार्यक्रम पार पडला. या मेळाव्यात व्यासपीठावरून बोलत असताना त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले.अहमदनगरमध्ये माजी आमदार अनिल राठोड असताना त्यांनी शिवसेना जिवंत ठेवली होती मात्र आता शहरात गुंडगिरी वाढली, अहमदनगरमध्ये भगवे वातावरण झाले आहे. अनिल राठोड नाहीत म्हणून कोणी संघर्ष करत नाही मग तुम्ही का रस्त्यावर उतरत नाही त्यामुळे आता आम्ही ठरवले आहे. आता मी रस्त्यावर उतरेल आमदाराविरुद्ध महाविकास आघाडीचा मोर्चा निघेल त्याचे नेतृत्व मी करेल," असे आश्वासन संजय राऊत यांनी दिले.


सर्वसामान्य जनतेसाठी बाळासाहेब ठाकरेंनी या शिवसेनेची स्थापना केली होती. निवडणूक आयोग किंवा राहुल नार्वेकर यांना विचारून स्थापन केली नव्हती. देशातल्या सर्वसामान्य जनतेला जाऊन विचारा की, शिवसेना कोणाची आहे? ते सांगतील शिवसेना उद्धव ठाकरेंची, बाळासाहेबांची, शिवसेना शिवसैनिकांची आहे, असं यावेळी बोलताना राऊत म्हणाले.संजय राऊत यावेळी पंतप्रधान मोदीवरही निशाणा साधत बोलताना म्हणाले की, "रामाबरोबर हाताला काम सुद्धा द्या. महागाईवर पंतप्रधान बोलत नाहीत त्यांना रडू कोसळते रामाची मूर्ती पाहून. मात्र पुलवामा मध्ये 40 जवान शहीद झाले तेव्हा रडले नाहीत, शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा रडत नाही, काश्मीरमध्ये हजारो पंडितांचे वध होतात तेव्हा रडत नाही मात्र आता नाटक करता?" अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Tags:    

Similar News