शिवजयंतीनिमित्त मुंबईत पार पडला राष्ट्रवादी काँगेस आयोजित स्वराज्य सप्ताह शुभारंभ सोहळा

Update: 2024-02-13 06:31 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य, जिल्हा तसेच तालुका स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त ‘राज्य रयतेचे-जिजाऊंच्या शिवबाचे’ या स्वराज्य सप्ताहाचे आयोजन दि. १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. यानिमित्त विविध शहरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक शिवप्रेमींनी या स्वराज्य सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी पक्षांकडून करण्यात आले आहे.




 


या कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा काल मुंबईतील गेटवे ऑफ इंडीया याठिकाणी पार पडला. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील प्रफुल्ल पटेल आदी नेते उपस्थित होते.




 


Tags: