फेसबुक लाईव्हवर ठाकरे गटाच्या नेत्याच्या मुलाची मुंबईत गोळ्या झाडून हत्या

Update: 2024-02-08 20:50 GMT

शिवसेना (UBT) नेत्याचा मुलगा अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह करत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या यामधे अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला असून, हल्लेखोराने स्वत:वर बंदूक वळवत स्वतावराही गोळ्या झाडून घेतल्या आहेत, फेसबुक लाईव्ह दरम्यान हे शूटिंग कॅमेरात कैद झाले आहे. यामधे घोसाळकर आणि त्यांचा हल्लेखोर दोघेही मरण पावले आहेत. दहिसर भागातील एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

घोसाळकर हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विनोद घोसाळकर यांचे पुत्र होते.

हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचं सांगितलं जात आहे, हा हल्ला मॉरिस नोरोन्हा यांच्या कार्यालयात झाला, मॉरिस नोरोन्हा याची मॉरिस भाई म्हणून दहिसर परिसरात ओळख होती.

दोघांमध्ये आधीपासूनच वाद होते. अलिकडल्या काळातच त्यांची मनजुळणी झाली होती, घोसाळकर यांना त्यांच्या कार्यालयात एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते, दोघांचं बोलणं फेसबुक वर लाईव्ह असतांना मॉरिस निरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला, गोळीबाराचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

 

"आता मला माहिती मिळाली आहे की अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या आहेत... किती दिवस हे सहन करायचे? यामुळे महाराष्ट्राची बदनामी तर होत आहेच, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्योगधंदे होणार नाहीत. महाराष्ट्रात या, अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे, असे माजी राज्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर एका भाजप आमदाराने गोळीबार केल्याची घटना ताजी असतांना घोसाळकर यांची हत्या झाली. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Tags:    

Similar News