निर्मला सितारामणच्या पतीचा इशारा; म्हणाले पुन्हा भाजप सत्तेत आले तर.....वाचा सविस्तर बातमी

Update: 2024-04-08 15:39 GMT

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे पती राजकीय अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपचा पुन्हा विजय झाला तर, देशात पुन्हा निवडणूका होणार नाहीत. काँग्रेसने त्यांच्या या विधानाचा एक व्हिडीओ सुध्दा ट्विट केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान परकला प्रभाकर असेही म्हणाले की, २०२४ लोकसभेच्या या निर्णायक निवडणूकीत सत्ताधारी भाजप विजयी होऊन निवडून आले तर देशात पुन्हा निवडणूक होईल याची अपेक्षाच करू नका. हे सरकार पुन्हा सत्तेत आले तर कोणतेही निवडणूक होणार नाही. देशाचा सध्याचा भौगोलिक नकाशा आणि भारतीय संविधान पूर्णतः बदलून जाईल, तुम्हाला ते ओळखता येणार नाही, तुम्ही सध्या भाजप नेत्यांच्या तोंडून एखाद्याला पाकिस्थानात पाठवण्याची विधाने ऐकत असाल, पण यानंतर थेट दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून तुम्हाला अशी विधाने ऐकायला मिळतील, असा दावा परकला प्रभाकर यांनी यावेळी केला.

सध्या जे मणिपूरमध्ये होत आहे, ते आपल्या परिसरात देखील होऊ शकते. आज मणिपूर व लडाखमध्ये असणारी परिस्थिती उद्या संपूर्ण देशामध्ये उद्भवू शकते, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 

Tags:    

Similar News