शरद पवारांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर आहेत: डॉ. अमोल कोल्हे

Update: 2021-07-17 15:51 GMT

शिरुर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करून खासदार झालेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी आज शिरूर लोकसभा मतदार संघातील पुणे ते नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील नारायण गाव बाह्यवळण रस्त्याचं उद्घाटन केलं. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर टीका केली.

यावेळी पुणे ते नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील नारायण गाव बाह्यवळण रस्त्याचं श्रेय घेणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी टीका करताना 'शरद पवारांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर आहेत' अशा शब्दात शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

''संसदेत महाराष्ट्राची, महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांची बाजू कोण मांडतं? हे पण तुम्हाला समजून जाईल. माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर टीका करणं हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल. हा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली लपवला जात असेल. तर माननीय मुख्यमंत्री पदावर आहेत. कारण आदरणीय शरद पवारांच्या आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे ही गोष्ट विसरू नये. महाराष्ट्राचा सरकार हे राज्याच्या हितासाठी आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी त्याला कुणी नख लावण्याचा प्रयत्न करू नये"

अशा शब्दात डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Full View

Tags:    

Similar News