नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांच नाव असावे: विनोद पाटील

Update: 2021-06-22 07:49 GMT

नवी मुंबई विमानतळा नावावरून चांगलच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. त्यातच आता, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांनी सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया देत, नवी मुंबई विमानतळाच नाव छत्रपती शिवाजी महाराजच असावे अशी आमची इच्छा असल्याचं म्हंटलं आहे.

विनोद पाटील म्हणाले की,विमानतळाच नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अस आहे. सध्या असलेल्या विमानतळावर जागा अपुरी पडत असल्याने नवी मुंबई येथे नवीन विमानतळ साकारत आहे, सदर विमानतळ मुंबई विमानतळाचाच भाग असणार आहे आणि सध्या असलेलं विमानतळ हे आंतरराज्य ( Domestic )व नवीन विमानतळ हे आंतरराष्ट्रीय (International) विमानतळ होणार आहे. त्यामुळे नवीन विमानतळाच नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असच असेल.

तसेच, राज ठाकरे यांची देखील हीच भूमिका आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच नाव येत असेल त्यावेळेस दुसरा वाद निर्माण होईल असे वाटत नाही. नवीन विमानतळ हे सध्याच्या विमानतळाचाच भाग असल्याने त्यास सद्या असणार म्हणजेच "छत्रपती शिवाजी महाराजांचच" नाव असेल आणि तेच असावं अशी आमची इच्छा आहे,असं विनोद पाटील म्हणाले आहेत.

Tags:    

Similar News