शरद पवार, पंकजा मुंडे यांच्या भेटीवर चर्चा ; मुंडेचा सरकारला आंदोलनाचा इशारा

Update: 2024-01-05 08:10 GMT

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीतून या ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. दरम्यान राज्यातील ऊसतोड कामगार मजुरीत 92 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांना सध्या 274 रुपये प्रति टन मजुरी दिली जाते. परंतू त्यात आता 34 टक्के दरवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना चालू हंगामापासून 366 रुपये प्रति टन मजुरी मिळणार असल्याचं सागण्यात येतंय.

दरम्यान यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की "राज्यातील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच काम अपेक्षित गतीने पुढे जात नाहीये. त्याबद्दल आपण असमाधानी असल्याचं म्हटलंय. या संदर्भात आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये जर वेळ आलीचं तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा थेट इशार भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारला दिला आहे.

Tags:    

Similar News