हनुमान चालिसाचं राजकारण पडलं महागात, रवी राणा यांचा भाऊ पराभूत

हनुमान चालीसा वरून राजकारण पेटवणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांना चांगलाच धक्का बसलाय.

Update: 2023-04-29 08:16 GMT

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालिसावरून राजकारण तापवले होते. मात्र आता दांपत्याला हनुमान चालिसाचं राजकारण चांगलंच भोवलं आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हातात हनुमान चालिसा घेत नवं राजकारण सुरू केलं होतं. मात्र त्यांना हनुमान चालिसाचं राजकारण महागात पडलंय. रवी राणा यांचे भाऊ सुनील राणा हे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

हनुमानाचं चित्र असलेली चांदीची नाणी वाटून APMC जिंकू पाहणाऱ्या रवी राणा यांचा भाऊ ही पराभूत झाले. ही तर हनुमानाने दिलेली शिक्षा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या समर्थकांनी दिली.

Tags:    

Similar News