समस्या सीमा पर नहीं दिल्ली में है, मोदींच्या वक्तव्याचा दाखला देत ओवैसी यांचा हल्लाबोल

Update: 2023-08-10 09:50 GMT

विरोधी पक्षांनी मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी सरकारचं मौन सोडवण्यासाठी अविश्वास ठराव आणला आहे. त्यावर आज तिसऱ्या दिवशी चर्चा सुरू आहे. या चर्चेत बोलताना एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

रेल्वेत जवानाने मुस्लिम व्यक्तींना मारल्याचा उल्लेख करत हा विषाचा अजेंडा नाही तर काय आहे? असा सवाल उपस्थित केला. त्याबरोबरच मणिपूर आणि हरियाणातील नुह येथे मुस्लिम घरांवर बुलडोझर चालवला. त्याचाही उल्लेख करत सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला. तसेच पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी २०१३ मध्ये चीनच्या मुद्द्यावर भाष्य करताना समस्या सीमेवर नाही तर दिल्लीत असल्याचे म्हंटले होते. त्यावरून ओवैसी यांनी मोदी सरकारवर टीका केली.

पंतप्रधान मोदी चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत मदुराईच्या किनारपट्टीवर का फिरत होते? चीनला सडतोड उत्तर का दिलं जातं नाही? असं म्हणत ओवैसी यांनी मोदी सरकारवर टीका केली.

पुढे बोलताना ओवैसी म्हणाले, मणिपूरचे मुख्यमंत्री सहकार्य करतात म्हणून त्यांना हटवलं जात नाही. त्यामुळे एका शायरचं कोट वापरत ओवैसी म्हणाले, कुर्सी है तुम्हारा ये जनाजा तो नहीं, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते.

तसेच विश्वगुरू म्हणता मग कुलभूषण जाधव यांना परत का आणत नाहीत. अनेक अधिकाऱ्यांना दुसऱ्या देशात का सडू देता? असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला.

तसेच एक देश, एक भाषा, एक कायदा हा हुकुमशाही चा फॉर्म्युला आहे. कारण भारताची सुंदरता विविधतेत असल्याचेही खासदार ओवैसी म्हणाले.

Tags:    

Similar News