शरद पवार यांच्यासह चौदा जणांची समन्वय समिती स्थापन, समितीत कोणत्या नेत्यांचा समावेश ?

Update: 2023-09-01 11:15 GMT

मोदी सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

मोदी सरकार विरोधात स्थापन केलेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील नेत्यांची मुंबईत तिसरी बैठक पार पडली. या बैठकीत जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.

मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या दोन दिवसीय बैठकीत चौदा जणांच्या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत शरद पवार यांच्यासह संजय राऊत यांचाही समावेश आहे.

काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे संजय राऊत, डीएमके टी आर बालू, आरजेडी चे तेजस्वी यादव, तृणमुल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा, समाजवादी पक्षाचे जावेद आली खान, जदयू चे लल्लन सिंह, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, सीपीआयचे डी राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती, आणि सीपीआय एम कडून नाव आलेले नाही. मात्र ही चौदा जणांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News