ED ने संजय राऊत यांची संपत्ती का जप्त केली?

Update: 2022-04-05 09:57 GMT

राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यातील संघर्ष तीव्र झालेला असताना आता पुन्हा एकदा एक मोठी घडामोड घडली आहे. शिवसेनेची तोफ म्हणून प्रसिद्ध असलेल्या खासदार संजय राऊत यांच्यावर EDने थेट कारवाई केली आहे. संजय राऊत यांचे अलिबागमधील ८ प्लॉट आणि दादर येथील एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. या कारवाई संदर्भात EDने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

Full View

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे मूल्य ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपये असल्याची माहिती ईडीने दिली आहे. गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास करणाऱ्या आशीष कन्स्ट्रक्शनशी संबंधित या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये संजय राऊत यांचे भाऊ प्रवीण राऊत यांची पालघर येथील जागा, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि श्री पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावावर असलेले अलिबागमधील किहीम बीच येथील प्लॉट जप्त करण्यात आले आहेत तसेच वर्षा राऊत यांच्या नावावर असलेला दादरमधील राहता फ्लॅटही जप्त करण्यात आला आहे. गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक राकेश कुमार वाधवान, सारंग कुमार वाधवान आणि संजय राऊत यांचे भाऊ प्रवीण राऊत यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

Full View

ED ने संजय राऊत यांची संपत्ती का जप्त केली?

राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यातील संघर्ष तीव्रपत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील घोळाप्रकरणी PMLA अंतर्गत चौकशी सुरू आहे. यामध्ये ६७२ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार होते. यामध्ये गुरू आशीष कंन्स्ट्रक्शन कंपनीशी झालेल्या करारानुसार ६७२ लोकांना तयार फ्लॅट देऊन उर्वरित जागेतील फ्लॅट कंपनीला विकता येणार होते. पण या कंपनीने म्हाडाचा फसवणूक करत उपलब्ध FSI इतर विकासकांना विकल्याचा आरोप आहे. यामध्ये कंपनीने बेकायदेशीर रित्या सुमारे १ हजार ३९ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या कंपनीमध्ये प्रवीण राऊतही होते. १ हजार ३९ कोटीं रुपये आपापसात वाटून घेण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासानुसार कुणाकुणाच्या खात्यात गेले याची माहिती समोर आली आहे. HDILच्या खात्यामधून प्रवीण राऊत यांच्या खात्यात १०० कोटी रुपये ट्रान्सफर झाले होते, अशी माहिती ईडीने दिली आहे. त्यानंतर हेच पैसे प्रवीण राऊत यांच्या जवळच्या लोकांच्या आणि कुटुंबातील इतरांच्या खात्यात जमा झाले होते, अशी माहिती ईडीने आपल्या पत्रकार दिली आहे.

Tags:    

Similar News