महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांनी मिठाचा खडा टाकू नये: अजित पवार

सामना दैनिकातून अनिल देशमुख यांना गृहमंत्री पद हे अपघाताने मिळाले आहे असं म्हटल्यानंतर अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीच्या बातम्या येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलं चालू असताना महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांनी मिठाचा खडा टाकू नये अशी भुमिका मांडली आहे.

Update: 2021-03-28 11:47 GMT

अनिल देशमुख यांना गृहमंत्री पद हे अपघाताने मिळाले आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले,

कोणाला मंत्री करावं आणि कोणाला कुठलं मंत्री द्याव हे आमचे सर्वोच्च नेते शरद पवार हेच ठरवत असतात. कॉंग्रेसमधे सोनिया गांधी ठरवतात. मात्र महाविकास आघाडीचे सरकार असणाऱ्यांनी आपल्या सहकार्यांना अडचणीत आणायचा प्रयत्न कोणी करू नये .. त्र्यस्थानी केले तर ठीक आहे मात्र महाविकास आघाडी च्या सहकार्यांनी असं वक्तव्य करून कुठेतरी वाद वाढण्यासाठी मिठाचा खडा टाकू नये अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवरुन यावर प्रतिक्रीया देत कान उघाडणी करणं, कौतुक करणं केलेल्या कामाची स्तुती करणं, कधीतरी टिका करणं. हे स्तंभ लेखकांच व पत्रकारांच कामच आहे.

त्याच्यातून शिकायलाही मिळत आणि पुढची पावल कशी टाकायची हे समजूनही घेता येतं.फक्त आपलं कायम कौतुकच होईल अशी अपेक्षा कोणीच बाळगू नये, अशी प्रतिक्रीया दिली आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनी एकमेकाचा आदर ठेवून वागले पाहिजे.दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण हे फारच दुःखदायक आहे या प्रकरणात जे कोणी जबाबदार असतील यात वरिष्ठ अधिकारी असो किंवा दुसरा कोणीही असो यात पोलिस सर्व प्रकार पुढे आणतील आणि जो कोणी यात जबाबदार असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं त्यांनी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येवर विचारलेल्या प्रश्नाव अजित पवारांनी सांगितले.

मागील काही वर्षांमध्ये आपण वीज बिलात सवलत दिली होती त्यामुळे आता येणारे बिल शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने भरावं असही वीजबिलाच्या मुद्द्यावरु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.

Tags:    

Similar News