APMC Election : नांदेडमध्ये काँग्रेसचा भाजपला धक्का, अशोक चव्हाण यांनी गड राखला

नांदेड जिल्ह्यातील भोकर, हिमायनगर, कुंटूर या चार बाजार समित्यांपैकी तीन बाजारसमित्यांच्या निवडणूकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिली आहे.

Update: 2023-05-01 01:10 GMT

नांदेड जिल्ह्यातील भोकर, हिमायनगर, कुंटूर या चार बाजार समित्यांपैकी तीन बाजारसमित्यांच्या निवडणूकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिली आहे. तर जिल्ह्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या भोकर, हिमायतनगर, कुंटूर या बाजारसमित्यांच्या निवडणूकींचा निकाल रविवारी दुपारी जाहीर करण्यात आला.

या निवडणूकित हिमायतनगर ,भोकर येथे काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध करीत यश मिळविले, तर कुंटुर बाजार समितीत भाजपा १० जागा आणि काँग्रेस ७ जागांवर विजय मिळवित काँग्रेस-भाजपा युतीचा फॉर्म्युला यशस्वी ठरला आहे..

नांदेड बाजार समितीचा निकाल जाहीर करण्यात आला यात

महाविकास आघाडीला बहुमत मिळाले आहे, एकहाती काँग्रेसकडे सत्ता ठेवणाऱ्या अशोक चव्हाणांचा हा ‘दे धक्का’ समजला जातो आहे, नांदेड बाजार समितीत सर्वच्या सर्व १८ जागा महाविकास आघाडीकडे गेल्या आहेत यात काँग्रेस १२, राष्ट्रवादी ३, ठाकरे गट २ तर १ जागा अपक्षाला मिळाली आहे.

नवनिर्वाचित अपक्ष सदस्याचे महाविकास आघाडीला समर्थन मिळाले आहे. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचा सुपडा साफ झाला आहे, त्यांना खातेही उघडता आले नाही.

हिमायतनगर बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वात १८ पैकी १८ जागा जिंकून एकहाती सत्ता प्रस्थापित केली.

ठाकरे गटासह विरोधकांचा पराभव झालाय. कुंटूर बाजार समितीत एक दुसऱ्याच्या विरोधात उमेदवारी दाखल केलेल्या काँग्रेस व भाजपने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक दुसऱ्याला पाठींबा देत केलेला शेतकरी विकास पॅनलच्या युतीचा प्रयोग यशस्वी झाला असून मतमोजणीनंतर सर्वच्या सर्व १७ जागेवर एकतर्फी विजय मिळवला.

अशोक चव्हाण यांचे होमपीच असलेल्या भोकर येथील डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लढतीत सर्वच पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.सूजाण मतदारांनी काँग्रेस पक्षाला पंसती दिल्याने १८ जागा पैकी १५ जागेवर वर्चस्व प्रस्थापित करीत बहुमत सिद्ध केले आहे. भाजपास ३ जागेवर समाधान मानावे लागले तर नव्याने शिरकाव केलेल्या बीआरएस पक्ष व शिवसेना ठाकरे गटाला मतदारांनी नाकारल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

Tags:    

Similar News