केंद्रीय मंत्री स्मृती इराणींविरोधात पुण्यात महागाई आंदोलन, पोलिसांनी केली कारवाई

'हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई!, जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी।, क्योकि गॅस भी कभी सस्ती थी,स्मृती जी याद हैं ना? अशा प्रकारच्या घोषणा देत पुणे महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात आंदोलन केले. घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मंत्री इराणी यांना चूल व बांगड्या भेट देण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या होत्या.;

Update: 2022-05-16 16:41 GMT
0
Tags:    

Similar News