राणे - शिवसेना संघर्ष टोकाला, नीलरत्न बंगल्यावर कारवाईचे आदेश

Update: 2022-02-20 09:25 GMT

राज्यात राणे विरुध्द शिवसेना वाद रंगला आहे. तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणे यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टिकास्र सोडले. त्यानंतर विनायक राऊत यांनी राणे यांना लाव रे तो व्हिडीओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. तर राणे यांच्या जुहू येथील बंगल्यासंबंधी नोटीशीचा वाद ताजा असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवर असलेल्या नीलरत्न बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात राणे विरुध्द शिवसेना वाद चांगलाच पेटला आहे. त्यातच राणे यांनी जुहू येथील बंगल्याप्रकरणी आलेल्या नोटीशीला उत्तर देताना दिशा सलियान आणि सुशांत सिंह राजपुत यांच्या मृत्यूबाबत खळबळजनक आरोप केले. त्यापाठोपाठ राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-चिवला बीचवरील नीलरत्न बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राणे यांच्या अधीश बंगल्याचा वाद ताजा असतानाच त्यांच्या अविघ्न इमारतीसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यापाठोपाठ राणे यांच्या नीलरत्न बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याने राणे यांच्यासमोरील विघ्न वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हारमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजच्या नागपुर येथील कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा नारायण राणे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे विरुध्द शिवसेना वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर राणे यांनी मातोश्री दोनचे अनधिकृत काम पैसे देऊन अधिकृत करून घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर राणे यांच्या मालवण बीचवरील बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या कारवाईला नारायण राणे काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News