…तर विक्रांत वाचवता आली असती- संजय राऊत

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या (Sanjay raut Vs Kirit Somaiya) यांच्यावर INS विक्रांत प्रकरणी केलेल्या आरोपांमुळे सोमय्या चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यातच संजय राऊत यांनी ट्वीट करत 58 कोटी रुपये हडप केले नसते तर विक्रांत वाचवता आली असती असा टोला सोमय्यांना लगावला आहे.

Update: 2022-04-12 03:30 GMT

संजय राऊत यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, किरीट सोमय्या INS विक्रांत युध्दनौका वाचवण्यासाठी 140 कोटी रुपये जमा करून राजभवन येथे देणार होते. त्यासाठी त्यांनी INS विक्रांत वाचवा हे अभियान सुरू केले होते. मात्र त्यांनी जमा केलेले पैसे INS विक्रांत वाचवण्यासाठी दिले असते तर INS विक्रांत वाचवता आली असती. कारण INS विक्रांत 60 कोटी रुपयांना भंगारात विकण्यात आली. ज्या बाप बेट्याने 58 कोटी जमा केले त्याचा हिशोब लागत नाही. मात्र त्यांना हिशोब द्यावाच लागेल. कारण त्यांनी 58 कोटी हडप केले नसते तर विक्रांत वाचवता आली असती. (Sanjay raut Tweet)

Full View

पुढे संजय राऊत म्हणाले, INS विक्रांत अखेर भंगारात गेलीच. विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी 58 कोटी जमा केले. ते कुठे गेले? हाच प्रश्न न्यायालयाला देखील पडला. त्यामुळेच न्यायालयाने किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणात कसले आले राजकारण? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच संजय राऊत पुढे म्हणाले, गंमत इतकीच की, विक्रांत निधीचा अपहार करणाऱ्याच्या मागे भाजपा मजबुतीने उभी आहे, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.(Sanjay raut criticize to BJP)

Full View

दरम्यान किरीट सोमय्या यांचा मुंबई सत्र न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या अडचणीत आले आहेत. तर संजय राऊत यांनी आणखी एका ट्वीटच्या माध्यमातून म्हटले आहे की, बाप बेटे जेल जायेंगे.. अनिल देशमुख नवाब मलिक के बाजुकेही कोठडी मे रहेंगे.., अशा इशारा दिला होता.

Full View

किरीट सोमय्या नेमके कुठे आहेत? (Where is kirit somaiya)

किरीट सोमय्या हे देशाबाहेर पळाले असण्याची शक्यता संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. तर संजय राऊत सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की, मेहुल चोक्सी (Mehul Choksy) हा किरीट सोमय्या यांचा चांगला मित्र आहे. त्यामुळे जसा मेहुल चोक्सी देशाबाहेर पळाला. तसेच किरीट सोमय्या देशाबाहेर पळाला असण्याची भीती वाटत आहे, असेही संजय राऊत म्हणाले होते.

दरम्यान संजय राऊत यांनी राजभवनने किरीट सोमय्यांसाठी नकली कागदपत्रे बनवून देशद्रोही कृत्यात सहभागी होऊ नये, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

Tags:    

Similar News