जागतिक मंदीतही सोनं पन्नाशी पार

Update: 2020-07-03 01:48 GMT

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था विस्कळीत झालेली आहे. पण भारतात मात्र सोन्याचे दर वाढत चालले आहेत गुरुवारी सोन्याच्या दराने 50 हजारांचा टप्पा पार केलेला आहे. त्यामुळे तोळ्याला सोन्याचा भाव सध्या 51 हजार पाचशे रुपये झालेला आहे.

जळगाव मधील सराफ बाजार उघडतात गुरुवारी सोन्याचे दर पन्नास हजार 700 रुपयांवर पोहोचले आणि जीएसटी मिळून हाच दर 51 हजारांच्या पुढे गेला आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव 49 हजारांवर पोहोचला होता. तर चांदीच्या भावात देखील वाढ झाली आहे.

चांदी प्रति किलो 51 हजार 500 रुपये आहे.

हे ही वाचा..!

आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने होत असलेल्या चढउतारामुळ सोने चांदीच्या दरात बदल होत आहे.

कोरोनामुळे जागतिक बाजारपेठेत मंदी आहे.

सोन्या चांदीचे भाव ऐतिहासिक उंचीवर पोहचले आहेत पणतरी सोन्याची खरेदी विक्री सध्या खूपच कमी आहे.

गुंतवणूक दारांनी सोन्याला अधिक पसंती दिली आहे.

Similar News